पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांमध्ये उमेदवारी न दिल्याने शैलेश टिळक आणि ब्राम्हण समाज नाराज झाल्याच्या बातम्या येत होत्या. यातच भाजपने कुणाल टिळक यांना पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या एका खेळीने आतापर्यंत तरी भाजपमध्ये सर्व काही सुरक्षित सुरू झालं आहे.
हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व चिरंजीव कुणाल टिळक यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र भाजप श्रेष्ठींच्या राजकीय गणितात ते बसले नसावे. त्यामुळे त्यांनी दोघांनाही उमेदवारी दिली नाही. त्यावरून ते नाराज होणे स्वाभाविक होते. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस त्याचवेळी कुटुंबात उमेदवारी का नाही? अशी टिका करत भाजपला भंडावून सोडत होते.
हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
मात्र त्यानंतर संध्याकाळी उशिरा भाजपच्या शहर कार्यालयात हेमंत रासने यांच्या प्रचाराच्या नियोजनाची जी बैठक झाली. त्याला शैलेश टिळक व कुणाल टिळख हे दोघेही उपस्थित झाले. खुद्द शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीच माध्यमा प्रतिनिधींसमोर आणले. प्रचारात सहभागी होणार, असे या पिता-पुत्रांनीच जाहीरपणे सांगितेल. पक्षाचा म्हणून काही विचार असतो. तो त्यांनी मान्य असल्याचंही सांगितले. हे झाले कसे?
हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
तर त्याचदिवशी सांयकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल टिळक यांना फोन केला. ते त्यांच्यासोबत सविस्तर बोलले. त्यामुळे मग टिळक कुटुंबाची नाराजी संपली. जे कोणालाही जमले नव्हेत ते फडणवीस यांनी केवळ एका फोनने साधले. म्हणून तर फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है, असे आता भाजप कार्यकर्ते म्हणून लागले आहेत.
Read also
- हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
- हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
- हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
- हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात