नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव मांडत आहेत. काल मोदींनी लोकसभेत भाषण केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर जोरदार टिका करत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यात आज लोकसभेपेक्षा राज्यसभेत विरोधकांनी वेगळी रणनीती आखली आहे. मोदींच्या संपुर्ण भाषणादरम्यान मोदी-अडाणी भाई भाईंच्या घोषणा विरोधकांनाकडून सुरू आहेत. त्यामुळे राज्यसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहेत.
हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी केलेल्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. अनेक ठिकाणी यावरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने देखील काढण्यात आली आहेत. यातच राहुल गांधी यांनी लोकसभेत अडाणीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावर मोदींनी लोकसभेत बोलण्याचं टाळलं.
हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
आज राज्यसभेत मोदींचं भाषण सुरू असतांना विरोधकांनी मोठा गोंधळ केला आहे. मोदींच्या संपुर्ण भाषणात मोदी, अडानी भाई भाई विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. बंद करो, बंद करो भाषणाबाजी बंद करो चा नारा विरोधकांकडून देण्यात येत आहे. यामध्येही नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरूच आहे.तसेच विरोधकांकडून जेपीसी चौकशीची मागणीही केली जात आहे.
Read also
- हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
- हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
- हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
- हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला