पिंपरी । प्रतिनिधी पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता भाजपातर्फे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करुन घेण्यात आला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळ कसब्यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.
हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
दुसऱ्या बाजूला चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आघाडीचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे याठिकाणी ही निवडणुक तिरंगी होणार आहे.
हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे :
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय उर्फ बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा ४० जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
Read also
- हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
- हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
- हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
- हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य