पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून फोडण्यात आला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराच्यावेळी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावत प्रचाराला सुरूवात केली. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी देखील आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. यातच त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं. नेहरू चौक येथील व्यापारी बांधवांच्या वतीने फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये रवींद्र धंगेकर यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, तीस वर्षात खरचं काही कमवले असेल तर ते पुणे शहरातील लाखो लोकांचे प्रेम कमावलं. राजकीय आयुष्यात आपला माणुस नगरसेवक व्हावा, आमदार व्हावा. ही त्यांची अपेक्षा बरोबरच आहे. निश्चितच आजवर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा रवींद्र धंगेकर त्यांची ही इच्छा देखील पुर्ण करणार. असं रवींद्र धंगकेर यांनी म्हटलं.
हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
मतदार संघात फिरत असतांना अनेक लोकांचा पाठिंबा मिळत आहेत. राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शिवसेना , वंचितमधील सगळ्याच नेत्यांचा सध्या मदत करीत आहेत. मात्र यामध्ये मला भाजपमधील काही कार्यकर्ते देखील माझे मित्र आहेत. तेही मला मदत करत असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. रविंद्र धंगेकर सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कसबा पेठतील जनतेचा आमदार म्हणून त्यासाठी नागरिकांना 24 तास 365 दिवस त्यांच्यामध्ये हजर राहणार आमदार मी बनवून दाखवणार. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. असाच आपला विश्वास येत्या 26 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत माझ्यावर दाखवा आणि तुमच्या हक्काच्या आमदाराला विधानसभेत पाठवा असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
- हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
- हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
- हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा