पुणे : दोन दिवसाआड महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. यातच मागे आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षाही काढून घेतल्यानंतर राज्य सरकारवर कडाडून टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची आणि पोलिस खात्याची जबाबदारी असते. लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होणार असतील तर यामध्ये गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. असे हल्ले कोणावरही होऊ नयेत. यामागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करावे. कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा समाजात संदेश द्यावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या जाहीरातबाजीवर अजित पवार यांनी निशाणा साधला. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे हे जाहीरातबाजी केल्याशिवाय सर्वसामान्यांना कसे कळणार? असा उपरोधिक टोला अजितदादांनी लगावला. कुठे खर्च करावा, कशाला प्राधान्य द्यावे हे कळायला हवे. दुर्लक्षित-वंचित वर्गाचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने लोकाभिमुख कारभार करायचा असतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
दरम्यान, शिवसंवाद यात्रेदरम्यान शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तर काल विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. यानंतर आदित्य ठाकरे आणि प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली. मात्र या घटनांचा विरोधी पक्षांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
Read also
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
- हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
- हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
- हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
- हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर