पिंपरी । विशेष प्रतिनिधी आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून ओळखली जाणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारक यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील एकाही स्थानिक नेत्याचे नाव नाही. वास्तविक, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह माजी महापौर संजोग वाघेरे, निवडणूक प्रभारी योगेश बहल, भाउसाहेब भोईर हे प्रभावी वक्ते असून, यांना मानणारा मोठा मतदारवर्ग चिंचवड विधानसभेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला स्थानिक नेत्यांची प्रचारात आवश्यकता नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
राष्ट्रावादीच्या निवडणूक प्रचारक यादीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, फौजीया खान, वंदना चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, निलेश लंके, चिंचवड विधानसभा प्रभारी सुनील आण्णा शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, अली शेख या २० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे.
हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीकडूनही निवडणूक तब्बल ४० नेत्यांची प्रचारक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे, उमा खापरे यांच्यासह माजी खासदार अमर साबळे यांचेही नाव आहे. तसेच, केंद्रीय नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय उर्फ बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, हर्षवर्धन पाटील अशी प्रचारकांची तगडी फौज तयार केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पिंपरी-चिंचवड शहर कळलेच नाही…?
हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
दरम्यान, महाविकास आघाडीकडून बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट आव्हान दिले होते. उमेवारीवरुन डावलल्यामुळे ‘‘अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहर अद्याप कळलेच नाही’’ अशी टीकाही त्यांनी केली होती. चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचा मतदार नाही, असा दावाही त्यांनी केला होता. आता राष्ट्रवादीकडून प्रचारकांच्या यादीत स्थानिक एकाही नेत्याला सहभागी करुन न घेतल्यामुळे कलाटेच्या वक्तव्याला पुष्टी मिळाली आहे, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
Read also
- हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
- हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
- हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
- हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
- हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”