पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकरीता भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ काल फोडला आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरूवात केली असून स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कसब्यात एकूण 29 उमेदवार रिंगणार असून आज कोण माघार घेणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर रिंगणार आहेत. यातच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने अलिकडेच युती केली आहे. असं असतांना महाविकास मात्र यात संभाजी ब्रिगेडच्या अविनाथ मोहिते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कुणाला पाठिंबा देणार? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामाना असला तरी अनेक अपक्ष आणि राजकीय पक्षांनी अर्ज दाखल केल्याने ही लढत बहुरंगी होणार आहे. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे शिवसेनेला रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे. यातच वरिष्ठ सांगतील तसा निर्णय घेऊ असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी. आय, शिवसंग्राम पक्ष, तसेच इतर छोटे मोठ्या संघटनांचा पाठिंबा असणार आहे. तर रविंद्र धंगकेर यांना शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, वंचित तसेच इतर काही राजकीय संघटनांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे ही लढत जोरदार होण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
- हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
- हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
- हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही