मुंबई : आपल्या आयुष्यात गुरू पाहिजेच. जो गुरूला विसरला तो माणुस असुच शकत नाही. आपल्याकडे आता गुरू चोरणारी लोकं तयार झाली आहेत. वडील चोरणारी लोकं तयार झाली आहेत. त्यांना चोरी करू द्या, पण संस्कार चोरी करून येत नाहीत. ते जन्मजात असावे लागतात. अशी जोरदार टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्यावर केली आहे. तसेच चांगले संस्कार घेण्यासाठी आणि संस्कार जपण्यासाठी आज मी जैन मुनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहेत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
आज उद्धव ठाकरे मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. वालचंद हाईट्स येथे करण्यात आलेल्या जैन मंदिराच्या जीर्णोद्वारानिमित्ताने अंजन शलाका महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर प्रखर शब्दात समाचार घेतला.
हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
मागच्या जुलै महिन्यात पक्षादेश मोडून बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षावर दावा केला. परंतु घटनातज्ज्ञांनी देखील आमच्याच बाजूने मत दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाबाबत निकाल लागेपर्यंत निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेनेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे. तसेच त्याआधी सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागावा. अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
Read also
- हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
- “या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
- हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
- हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं