पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कसब्यात अपक्ष उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काॅंग्रेसची एक बंडाळी टळली. पंरतु संभाजी ब्रिगेडने देखील अर्ज दाखल केल्याने शिवसेनेकडून उमेदवारांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे. तर हिंदु महासभेकडून आनंद दवेंनी अर्ज सादर केल्याने भाजपचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना विनंती केली जात आहे.
हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
सध्या माझं वय 60 असून त्यातील 40 वर्ष काॅंग्रेसमध्ये काम केलं तरी मला पक्षांनी काहीच दिलं नाही, असं म्हणत बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यानंतर काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची समजतू काढल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यातच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली असली तरी संभाजी ब्रिगेडने अविनाश मोहीते यांनी अर्ज केला आहे. त्यांची देखील शिवसेनेच्या वतीने मनधरणी सुरू केली आहे.
हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
दुसरीकडे कसब्यातून हिंदु महासभेचे आनंद दवे यांनीही पोटनिवडणुकीसाठी अर्ज केला आहे. हिंदुंची सगळी मतं मलाच पडणार असा दावा आनंद दवे यांनी केला आहे. याची धास्ती भाजपने घेतली असून भाजपच्या नेत्यांकडून आनंद दवे यांच्याशी संपर्क साधला जात आहे. यातच संभाजी ब्रिगेडचे नेते सौरभ खेडेकर यांनाही अजित पवार यांनी फोन केला आहे. तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना देखील उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन येत आहेत.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ पोटनिवडणुक लागली आहे. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर मैदानात उतरले आहेत. यातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अपक्षांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून मनधरणी सुरू केली आहे.
Read also
- हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
- हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
- हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
- हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
- हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका