पुणे । विशेष प्रतिनिधी आगामी मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रणशिंग पुकारले आहे. त्यासाठी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे यांना ‘लक्ष्य’ करण्यात येत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली होती. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासून ‘फिल्डिंग’ लावली आहे.
हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
विशेष म्हणजे, आमदार सुनील शेळके यांची लोकसभा लढवण्याची महत्त्वाकांक्षा आणि क्रेझ आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या ऐवजी शेळके यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, सुनील शेळके यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या संधीचे सोने करीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना लक्ष्य केले आहे. मावळ मतदार संघात बारणे यांनी काय काम केले? त्यांना आगामी निवडणुकीत लोक स्वीकारणार नाही, अशी जहरी टीका शेळके यांनी चिंचवड दौऱ्यावर असताना केली. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शेळके विरुद्ध बारणे असा नवा संघर्ष पहायला मिळणार आहे.
हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
पार्थ पवारांचा पत्ता कट?
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये म्हणजेच साधारण वर्षभरावर आली आहे. मात्र, या मतदार संघातील निर्णायक विधानसभा क्षेत्र असलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पार्थ पवार अद्याप सक्रीय झालेले पहायला मिळत नाही. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून पार्थ पवार यांचे समर्थक नाना काटे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढत आहेत. असे असतानाही पार्थ निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे दावेदार पार्थ पवार यांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Read also
- हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
- हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
- हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
- हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”