पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या रिक्त झालेल्या जागेवर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे.सहाजिकच कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळेल शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हेमंत रासने यांना देण्यात आली. गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ म्हणून रासने यांना ही उमेदवारी देण्यात आली. कसबा मतदार संघातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपच्यामागे उभा राहिला आहे. कसब्यात 13 टक्के मतं ब्राह्मणांची आहे. यामुळेच रासने यांना उमेदवारी मिळताच विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण सुरु केले.
हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
दरम्यान, शैलेश टिळक हे सुरुवातीला काहीसे व्यथित झाले मात्र त्यांनी मुक्ता टिळक यांनी ज्याप्रमाणे पक्षादेश मानून स्वतः निष्ठेने भाजपमध्ये काम केले त्याच प्रमाणे शैलेश टिळक यांनीही रासने यांच्यासाठी झोकून देवून काम सुरु केले आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचा राग मनात न ठेवता पक्ष निष्ठेचा आपल्या आईचा वारसा पुढे नेत पक्षाचा आदेश मानून कुणाल टिळक यांनीही पक्षाचे काम सुरु केले आहे.
हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
याशिवाय स्वतः रासने यांचे देखील ब्राह्मण समाजाशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत यामुळेच ते अनेक वर्षे या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. या सर्व गोष्टींचा आता सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसू लागला असून या मतदार संघातील नाराज असणारा ब्राह्मण समाज देखील आता रासने यांच्या पाठीशी उभा राहू लागल्याचे चित्र आहे. यातूनच आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा ब्राम्हण विकास मंचने निर्णय घेतला आहे. यासोबतच पुणे शहर जय गणेश भावनामृत ब्राह्मण महासंघाने देखील रासने यांना पाठींबा दिला आहे. आणखी काही ब्राह्मण समाजातील संघटना देखील पाठींबा देतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे एकंदरीतच ब्राह्मण समाज हा जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावताना दिसत आहे.
धन्यवाद, ब्राम्हण विकास मंच !
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ब्राम्हण विकास मंचचे मनापासून धन्यवाद ! ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांचा मूलमंत्र अंगीकारुनच सदैव कार्यरत राहील. pic.twitter.com/nCGdJu257b
— Hemant Rasane (@HemantNRasane) February 12, 2023
Read also
- हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
- हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
- हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
- हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”