पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातच आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी शिंदे गटाची महत्वाची बैठक पुण्यात होत आहे. या बैठकीत भरत गोगावले, नरेश म्हस्के आणि शिंदे गटाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आता हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी शिंदे गट देखील मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी. आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प. रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना मिळून या महायुतीने पाठिंबा जाहीर केला आहे. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या पक्षातील उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आज शिंदे गटाची बैठक होत असून पुढील दिवसाची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कसबा पेठ पोटनिवडणुकासाठी प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळाच्या भेटीगाठी तसेच लोकांपर्यंत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहेत. यातच राजकीय नेत्यांच्या सभा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीची रंगत आता वाढतच चालली असून मतदार येत्या 26 फेब्रुवारी रोजी उमेदवारांचं भविष्य मतदार पेटीत टाकणार आहेत. त्यामुळे येत्या 02 मार्चला या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार त्याकडे आता सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
- हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
- हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश