पुणे : पुण्यात सध्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यातील काॅंग्रेस भवनामध्ये बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत काॅंग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक बघायला मिळाल्याने काॅंग्रेसच्या इतर नेत्यांचीही यामुळे पंचाईत झाली.
हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं होतं. यासाठी पुण्यातील काॅंग्रेस भवनमध्ये दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अनेक महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. मेळाव्याची तयारी आणि इतर मु्द्यांवरून चर्चा सुरू असतांना अचानक दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमेकांचा आवाज चढल्याने इतर कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. त्यानंतर हा वाद आणखीच चिघळ्याने वरिष्ठ नेत्याला यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
काॅंग्रेस भवनामध्ये झालेला हा प्रकार वाऱ्यासारखा इतरत्र पसरला. त्यानंतर त्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून सांयकाळी झालेल्या पक्ष मेळाव्यात देखील याचे पडसाद उमटले. त्यानंतर हा अशा घटना अधूनमधून होणारच अशी चर्चा रंगू लागली. मात्र काॅंग्रेसमधील खदखद बाहेर आल्याने इतर कार्यकर्त्यांमधलाही जोष काहीसा त्यामुळे कमी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे याचा फटका पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
दरम्यान, काल कसब्यात रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. त्या सभेला अजित पवार, नाना पटोले, आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. त्याआधी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये देखील काॅंग्रेसमधील अतंर्गत वाद बघायला मिळाला. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये वारंवार असे प्रकार घडत असतांना त्यांच्यावर विरोधक तुटून पडतांना दिसत आहेत.
Read also
- हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
- हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
- हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?