पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक 2023 च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल नाना काटे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर कडाडून टिकास्त्र सोडलं. गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे म्हणून ही निवडणुक अतिशय महत्त्वाची आहे. आताच्या काळात सर्वांना एकजुट दाखवण्याशिवाय पर्याय नाही. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत अजून एखादा उमेदवार उभा करून मतविभागणी करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. त्यामुळे आता आपल्यामध्येच मतांची विभागणी होता कामा नये. एक एक मत महत्त्वाचं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी त्यांचं पवित्र मत महाविकास आघाडीचे नाना काटे यांना देऊन प्रचंड मताधिक्यांना निवडून आणावं असं आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
पिंपरी चिंचवड महापालिकेवर पाच वर्ष भाजपचे बहुमत होते. त्या काळात भ्रष्टाचार झाला, कोणाचाही वचक नव्हता, याची मोठी किमंत पिंपरी-चिंचवड शहराला मोजावी लागली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंथ असतो. त्यांच्यावरील हल्ले हे लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचे काम होत आहे. निवडणुकीला जातीय रंग देण्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सर्व जाती-धर्म-पंथांबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहुन सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
- हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
- हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”