पुणे : पिंपरी चिंचवड शहरात दबादबा असणारे, राजकारणाची उत्तम जाण आणि समाजसेवेचे व्रत कायम असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अलिकडेच दिर्घ आजाराने निधन झाले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आता चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यासाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. एक मत आपल्या अश्विनीताईंना, आदरांजली लक्ष्मणभाऊंना.., असं म्हणत भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या समाज माध्यमांवर एक भावनिक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
महेश लांडगे यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी वहिनी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पिंपरी -चिंचवडकरांना माझे आवाहान आहे की, या माऊलीच्या मागे आपण सर्व जण खंबीरपणे उभे रहा. लक्ष्मण भाऊंचा समाजसेवेचा वारसा व वसा पुढे नेण्याचे काम नक्कीच वाहिनींच्या माध्यमातून होईल. यामध्ये काही शंका नाही.
हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
त्यामुळे येत्या 26 फेब्रवारी रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळात चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या कमळ या चिन्हसमोरील बटण दाबून स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ यांना आदरांजली द्यावी. सदर निवडणुक ही स्वाभिमानी पिंपरी-चिचंचवडकरांनी हाती घेतलेली आहे. असं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
दरम्यान, चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नाना काटे मैदानात आहेत. त्याचबरोबर राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुक तिरंगी होणार असून येत्या 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सगळेच राजकीय नेते सपाटून कामाला लागले आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष
- हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान
- हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
- हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
- हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक