पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान तर 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. कसबा पेठ ही विधानसभेची जागा मागील कित्येक वर्षापासून भाजपच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे ही जागा पुन्हा ताब्यात यावी, यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आढावा बैठकांचा धडका सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान
काल मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कोअर कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून प्रचाराची दिशा ठरवण्यात आली आहे. असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणुक प्रमुख म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांची निवडणुक प्रभारी म्हणून तर निवडणुक सहप्रमुख पदाची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे दिली आहे. त्याचबरोबर शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, त्याचबरोबर महायुतीचे अनेक पदाधिकारी या पोटनिवडणुकीसाठी झपाट्याने काम करतांना दिसत आहे.
हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांची निवड केली आहे. हेमंत रासने यांना बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. शिवसंग्राम, पतित पावन संघटना, लोक जनशक्ती आदींना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत येत्या 02 मार्चला कोण बाजी मारणार ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..“शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी, बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार ?”
- हेही वाचा..“तर तुम्ही रोज बदाम खा, पहाटेच्या शपथविधीवरून ट्विटवर रंगलं, राष्ट्रवादी अन् भाजप ट्विटवार”
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग
- हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
- हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष