मुंबई : मुंबई महापालिका हस्तगत करण्यासाठी भाजपने शिवसेना तोडली. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबई महापालिकेवर लक्ष्य ठेऊन आहेत. यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
आज शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वकील न्यायालयात जोरदार युक्तिवाद करीत आहेत. यावर आता आजच निर्णय होणार की ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात येणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. त्यामुळे सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मोठी धास्ती भरली आहे.
हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
यातच महाविजय 2024 संकल्पातून स्पष्टपणे दिसून येते की भाजपच्या दृष्टीने शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याशी युती होणार नाही व विलीनीकरण होऊ शकते. असो, महाराष्ट्रातील भाजपची हकालपट्टी अपरिहार्य आहे हे हल्लीच्या निवडणुक निकालातून स्पष्ट होते. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
दरम्यान, आगामी काही राज्यात काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांंकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच भाजपने महाविजय 2024 संकल्प केला असून मुंबई महापालिकेसह विधानसभेत 200 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यावर सचिन सावंत यांनी भाजपला टोला हाणला आहे.
“महाविजय २०२४” संकल्पातून स्पष्टपणे दिसून येते की भाजपच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याशी युती होणार नाही व विलीनीकरण होऊ शकते. असो, महाराष्ट्रातून भाजपची हकालपट्टी अपरिहार्य आहे हे हल्लीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 14, 2023
Read also
- हेही वाचा..“तर तुम्ही रोज बदाम खा, पहाटेच्या शपथविधीवरून ट्विटवर रंगलं, राष्ट्रवादी अन् भाजप ट्विटवार”
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग
- हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
- हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष
- हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान