मुंबई : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्यामुळेच झाला. असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस असत्याचा आधार घेऊन विधान करत आहेत. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी होत असून ट्विटवर देखील ट्विटवार रंगलं आहे.
हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात असत्याचा आधार घेऊन राजकारण केलं नाही. प्रसंगी खुर्ची सोडली परंतु सत्याची साथ सोडली नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा कुणाची आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असंही बावनकुळेंनी म्हटलंय. त्यावर पवार साहेबांच्या उत्तुंग कर्त्त्वाला तुमच्या पोचपावतीही गरज नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका लढत आहात ते तुमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांना जाहीर व्यासपीठावरून आपला गुरू म्हणतात आणि मानतात, याचा विसर पडला असेल तर रोज सकाळी बदाम खा, असा खोचक टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
राष्ट्रवादीच्या टिकेनंतर भाजपने पुन्हा राष्ट्रवादीला प्रत्यु्त्तर दिलं आहे. एवढ्या उत्तुंग कर्तृत्वाला राज्यात आमदारांची 60 का बरं ओलांडता नाही आली? एवढं उत्तुंग नेतृत्व होते तर, कायमस्वरूपी भावी बिरूदे लावून पंतप्रधान पदी बसण्याची वेळ का आली? माध्यमातून चालवलेल्या नरेटिव्हमधून शरद पवारांचे कर्तृत्व उत्तुंग असेल, जमिनीवर नाही. असं भाजपने म्हटलं आहे.
एवढया उत्तुंग कर्तुत्वाला राज्यात आमदारांची साठी (60) का बरं ओलांडता नाही आली ?
एवढ उत्तुंग नेतृत्व होते तर, कायमस्वरूपी ‘भावी’ बिरुदे लावून पंतप्रधान पदी बसण्याची वेळ का आली?
माध्यमातून चालवलेल्या नरेटीव्ह मधून शरद पवारांचे कर्तृत्व उत्तुंग असेल, जमिनीवर नाही. https://t.co/xxAMQVg4xV
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 13, 2023
Read also
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग
- हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
- हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष
- हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान
- हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले