पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख जागतिकस्तरावर व्हावी. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा. या करिता कायम सकारात्मक पुढाकार घेणारे लोकनेते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे कार्य उद्योगनगरीच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण ’ म्हणून सदैव स्मरणात राहील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी स्वर्गीय आमदार जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रमांनी दिमाखात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी प्रथम जयंती साजरी होत आहे.
हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
जगताप कुटुंबीय, भारतीय जनता पार्टीसह शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, जगताप मित्र परिवार, समर्थकांनी सांगवी येथील दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृतीस्थळी भेट दिली. आमदार महेश लांडगे यांनी नतमस्तक होवून दिवंगत आमदार जगताप यांना अभिवादन केले.
हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”
यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, भाजपाच्या वतीने पक्षाच्या मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातही दिवंगत आमदार जगताप यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
पप्पा, आज असायला हवे होते…
लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडवर तळहातावरील फोडाप्रमाणे प्रेम केले. शहराला जपले. त्यांचे पिंपरी-चिंवचडला ‘मेट्रो सिटी’ करण्याचे स्वप्न होते. मात्र, पप्पा आपल्यातून निघून गेले. या शहराला त्यांची उणीव कायम भासत राहील. प्रत्येकवर्षी उत्साहात वाढदिवस साजरा होत होता. यावर्षी जयंती साजरी करावी लागते आहे. पप्पा सदैव आमच्या कुटुंबासोबत आणि शहरातील प्रत्येक नागरिकासोबत आहेत. ‘‘तुमच्या संस्कारांचा आणि विचारांचा वारसा नेटाने आम्ही पुढे चालवू, अचे वचन मी पप्पांना देते’’. पप्पांची खूप आठवण येतेय. आज पप्पा असायला हवे होते…अशा भावना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे- जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.
Read also
- हेही वाचा.. ED सरकारने आमदारांची फौज गुवाहाटीला पळवली, त्याबदल्यात…;” सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक सवाल
- हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार
- हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास
- हेही वाचा..““भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”
- हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”