मुंबई : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्री मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही दिवसात दोनदा मुंबई दौरा केला आहे. यातच केंद्रीय मंत्री अमित शहा देखील येत्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भाजपवर कडाडून टिका केली आहे.
हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”
भाजपाचे पतन थांबविण्यासाठी साक्षात मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटव्या लागत आहेत. पराभवाच्या भितीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला भाजपसमोर जात नाहीत. यंत्रणा आणि माध्यमाच्या जोरावर 40 पैसेवाल्याच्या नजरेत पदवीधर, शिक्षक मतदार संघात पक्षाला उमेदवार देऊ न शकणार फडणवीस हे पॉवरफुल नेते आहेत. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
दरम्यान्, अलिकडेच झालेल्या राज्याच्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. पाच पैकी भाजपला कोकण पदवीधरची जागा राखता आली. तर नागपुर आणि अमरावती येथील जागा त्यांना गमवावी लागली. यातच महाविकास आघाडीला पाच पैकी 3 जागा जिंकण्यात यश आलं आहे. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.
भाजपाचे पतन थांबविण्याकरीता साक्षात मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटव्या लागत आहेत.पराभवाच्या भितीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला भाजप समोर जात नाहीत.यंत्रणा आणि माध्यमाच्या जोरावर 40 पैसेवाल्याच्या नजरेत
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 15, 2023
Read also
- हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”
- हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले
- हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
- हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”
- हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?