पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. या पाठींब्यामुळे भाजपला आपला विजय सुकर होईल अशी आशा आहे.
हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
कसबा मतदारसंघात मनसेची चांगली ताकत आहे. राज ठाकरे यांना मानणारा आणि हिदुत्वाच्या मुद्द्यावरून मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाची मते आता भाजपला मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे नेते टेन्शनमध्ये आले आहेत. यातूनच आता राज ठाकरे यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.
हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती,” त्यामुळे सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
पुणे शहरातील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी मनसेवर याच मुद्द्यावरून टीका केली. ते म्हणाले, कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय…बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत. असं म्हणत जगताप यांनी मनसेवर टीका केली आहे.
हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”
कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय…
बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत.#नवनिर्माणम्हणे— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 14, 2023
दरम्यान, जगताप यांच्या या टीकेला मनसेचे नेते योगेश खैरे यांनी जशासतसे उत्तर दिले आहे. 2019 च्या निवडणूका मा.राजसाहेबांच्या सभांचा आधार घेऊन लढवणाऱ्यांनी…. पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी मनसेचा पाठिंबा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ! असं म्हणत जगताप यांना खडेबोल सुनावले आहेत.
2019 च्या निवडणूका मा.राजसाहेबांच्या सभांचा आधार घेऊन लढवणाऱ्यांनी…. पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी मनसेचा पाठिंबा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ! https://t.co/WH4s4WJtFl
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) February 15, 2023
Read also
- हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले
- हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
- हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”
- हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?
- हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”