मुंबई : शरद पवार यांच्यामुळेच पहाटेचा शपथविधी झाला असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर देवेंद्र फडणवीस असत्याचा आधार घेऊन विधान करत आहेत. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी शरद पवारांवर जहरी टिका केली आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्यु्त्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”
पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार कुटुंब पुर्ण नासक्या मेंदूचं आहे. आयुष्यभर फक्त टोप्या लावायचं काम पवार कुटुंबाने केलं, मी मागे बोललो होतो, फडणवीस साहेब जेव्हा पहाटेच्या शपथविधीबद्दल महाराष्ट्राला सांगतील तेव्हा पवारांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. असा खोचक टोमणा नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबुब शेख यांनी नितेश राणेंना फैलावर घेतलं आहे.
हेही वाचा..“निवडणुकीत आपलाच विजय व्हावा,” हेमंत रासनेंसाठी भाजपची कोअर कमिठी अलर्टं मोडवर
ज्या पवारांच्या हस्ते स्वत:च्या हॉस्पिटल चे उद्घाटन केले. त्याच पवारांच्या नावाने टिका करून स्वत:ची पोळी भाजून घ्यायची आणि पवारांवर टीका केली म्हणजे तरी आपल्याकडे लक्ष वेधले जाईल. या हेतून कोकणातील कोंबडे कायम ओरडत असतात. राणे कुटुंब स्वत: सडक्या मेंदूच आहे. हे सगळा महाराष्ट्र जाणून आहे. विश्वासघात हा राणे कुटुंबाच्या डीएनएमध्ये आहे. त्यांनी इतरांना नावे ठेऊ नये. देवेंद्र फडणवीसला जे बोलायला येत नाही ते बोलायला हे कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
ज्या पवारांच्या हस्ते स्वतःच्या हॉस्पिटल चे उदघाटन केले त्याच पवारांच्या नावाने टीका करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि पवारांवर टीका केली म्हणजे तरी आपल्याकडे लक्ष वेधले जाईल या हेतूने कोकणातील कोंबडे कायम ओरडत असतात. राणे कुटुंब स्वतः सडक्या मेंदू च आहे. हे सगळा(1/1) https://t.co/NoTpn417i8
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) February 14, 2023
Read also
- हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?
- हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”
- हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
- हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती,” त्यामुळे सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
- हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”