पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात संपूर्ण राज्यात चर्चेत आलेला स्पर्श घोटाळ्यातील वादी आणि प्रतिवादी आता एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये माजी महापौर योगेश बहल यांची मोठी घुसमट होणार असून, राष्ट्रवादीत नवा-जुना असा सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. भाजपमधील नाराज नगरसेवक तुषार कामठे यांनी तडकाफडकी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर लवकरच कामठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जातो.
हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!
खरं तर, कोविड काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्पर्श भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपावर प्रचंड टीका केली होती. या प्रकणातील स्पर्श हॉस्पिटल व्यवस्थापन तत्कालीन भाजपचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या निकटवर्तींमध्ये होते, अशी चर्चा होती. पिंपरी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी दावेदार असलेल्या सुलक्षणा शिलवंत आणि योगेश बहल यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. यामध्ये तुषार कामठे यांनी शिलवंत यांना साथ दिली होती. त्यामुळे स्पर्श प्रकरणात शिलवंत-कामठे विरुद्ध बहल असा संघर्ष पहायला मिळाला. हे प्रकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यापर्यंत गेले होते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अजित पवार यांनी तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत यांना ताकद दिली. परिणामी, राष्ट्रवादीतील मोठा गट नाराज आहे.
हेही वाचा..“ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण
दरम्यान, तुषार कामठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याबाबत योगेश बहल यांचा विरोध आहे. परंतु, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कामठे यांचा प्रवेश निश्चित केला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यासाठी पुढाकार घेतला. शेळके आणि कामठे यांचे मैत्रीपूर्ण संबंध कामी आले. स्पर्श घोटाळा, वायसीएम रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट आदी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर तुषार कामठे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश बहल यांना लक्ष्य केले होते.
हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”
आगामी काळात सुलक्षणा शिलवंत आणि तुषार कामठे यांच्यासह बहलविरोध गट राष्ट्रवादीत प्रभावीपणे सक्रीय होणार असून, योगेश बहल यांची घुसमट होणार आहे. तसेच, भाजपातील नाराज नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेण्यात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह स्थानिक नेते कमी पडल्यामुळे आमदार सुनील शेळके यांचा आधार राष्ट्रवादीला घ्यावा लागला. भाजपाचा तगडा नगरसेवक फोडल्याचे श्रेय शेळके यांना मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत सुनील शेळके यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
Read also
- हेही वाचा..“ आव्हाडांच्या स्वीय साहाय्यकांसह चौघांना एकदिवसीय पोलीस कोठडी, मारहाण प्रकरण अंगलट
- हेही वाचा..“एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अन् शरद पवार पोटनिवडणुकीसाठी मैदानात”, पुण्यातील राजकारण तापणार
- हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
- हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
- हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट