ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांनी सुपारी दिल्याचे संभाषण असलेली एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर या क्लिपमधील आवाज असलेल्या मनपा अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे प्रकरण सध्या चांगलचं चिघळत चाललं आहे. या प्रकरणावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना आज ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा..“ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण
महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर आव्हाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकावर हल्ला करणे, शस्त्रास्त्र कायदा कलमे दाखल करण्यात आली आहेत.
हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”
आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने तसेच त्यांचे ऐकले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे महेश आहेर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, विशंत गायकवाड, हेमंत वाणी आणि विक्रम खामकर या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली.
Read also
- हेही वाचा..“एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अन् शरद पवार पोटनिवडणुकीसाठी मैदानात”, पुण्यातील राजकारण तापणार
- हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
- हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
- हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट
- हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!