पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काॅंग्रेसची देखील डोकेदुखी वाढली आहे. अलिकडेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचितकडे पाठिंबा मागितला होता. त्यावर आज वंचितची कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत वंचितने आपला पाठिंबा राहुल कलाटे यांना जाहीर केला आहे. त्यामुळे आघाडीत एकच गोंधळ उडाला असून यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
अजित पवार म्हणाले की, राहुल कलाट्यांना वंचितने जो पाठिंबा दिला आहे. ते पत्र जिल्ह्याचं आहे. ते काही वरिष्ठांनी दिलेलं नाही. परंतु आम्हाला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. वंचितने शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीसोबत युती केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ते त्यांनाच माहिती. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली
सुरूवातीपासून राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येईल. असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी राहुल कलाटे यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला.
हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच वचिंतचे प्रमख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दादर याठिकाणी युतीची घोषणा केली. मात्र या युतीत जागा वाटप आणि इतर काही गोष्टींचा काही ठरलं नसल्याची माहिती होती. यातच आता चिंचवडच्या पोटनिवडणुकीत वंचितने आपला पाठिंबा राहुल कलाटे यांना जाहीर करून ठेवला आहे. याआधी राहुल कलाटे यांनी वंचितकडे पाठिंबा मागितला होता.
Read also
- हेही वाचा.अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, राहुल कलाट्यांना वंचितचा पाठिंबा
- हेही वाचा..““देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला कसा वेळ मिळतो?”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
- हेही वाचा..““आव्हाडांना मारण्याची धमकी, कार्यकर्त्यांची आयुक्तांना मारहाण, ऋुता आव्हाडांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन”
- हेही वाचा..“हेमंत रासनेंना आता व्यापारी संघटनांनीही दिला पाठिंबा, भेट घेत साधला संवाद”
- हेही वाचा..“..तर भारताची सुधारणा अशक्य,” जंयत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा