पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या युतीचे उमेदवार हेमंत रासने हे कसबा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीला कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमधील व्यापारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
हेही वाचा..“जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी मध्य पेठांमधील विविध व्यापारी संघटनांसमवेत संवाद साधला. याप्रसंगी या संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजप आणि हेमंत रासने यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मेरा परिवार, भाजप परिवार, माझे कुटुंब भाजप कुटुंब अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा..““राष्ट्रीय समाज पक्षाची पुर्ण ताकद हेमंत रासनेंना देणार, विजयी गुलाल उधळणार”, महादेव जानकर
सुलभ आणि भयमुक्त व्यापार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या योजनांचे यावेळी पुन:श्च स्वागत करण्यात आले. तसेच, देशाचे प्रेरणादायी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय व्यापाराच्या होत असलेल्या भरभराटीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा..“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू
स्थानिक पातळीवर पुण्याच्या मध्यवस्तीतील व्यापारी पेठांमधील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने कार्यरत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा कायमच व्यापारी वर्गाला आधार राहिला आहे, याचाही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून उल्लेख केला.
Read also
- हेही वाचा..“..तर भारताची सुधारणा अशक्य,” जंयत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा
- हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
- हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली
- हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
- हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे