पुणे : भारतीय जनता पक्ष+बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) + आर.पी.आय.+ शिवसंग्राम पक्ष+रा.स.प. महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रा स प महायुतीच्या दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार
या वेळी बोलताना जानकर म्हणाले की ‘स्व गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून रा स पा ची भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण टीम कामाला लागली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय करून इथल्या प्रत्येक कामात सहभाग घेत आहोत.
हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास
तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत सुद्धा आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करत आहेत, मला विश्वास आहे की दोन्ही निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील या पत्रकार परिषदेला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्य संपर्कप्रमुख अजय भोसले रा स पा चे शहराध्यक्ष बालाजी पवार ,भा ज पा चे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, दादासाहेब रुपनार आदी उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा..“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू
- हेही वाचा..“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- हेही वाचा..““पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं”
- हेही वाचा..“शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात..! भाजप आमदार महेश लांडगे यांची भावना
- हेही वाचा.. ED सरकारने आमदारांची फौज गुवाहाटीला पळवली, त्याबदल्यात…;” सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक सवाल