पुणे : कसबा पेट पोटनिवडणुकीसाठी आता मनसेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सुरूवातीला कसबा पेट पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा मनसेच्या इच्छुकांनी व्यक्त केली होती. परंतु मनसेने आता नवी खेळी करत आपला पाठिंबा भाजपला दिला आहे. आता मनसेने पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावरून राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आणि मनसेच्या शहाराध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा. असं म्हणत पुण्यातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत मनसेने डिवचलं आहे. त्यानंतर मनसेचे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर घणाघात केला. साईनाथ बाबर यांनी अगदी खालच्या भाषेत प्रशांत जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..““पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं”
साईनाथ बाबरच्या टिकेला परत प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं. साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे. तु फक्त मन लावून नाचायचं काम कर. असं म्हणत प्रशांत जगताप यांनी साईनाथ बाबर यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा..“शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात..! भाजप आमदार महेश लांडगे यांची भावना
दरम्यान, हेमंत रासने यांना भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर. पी. आय. शिवसंग्राम पक्ष, रा.स.प. या महायुतीसोबत आता मनसेने देखील आपला पाठिंबा दिला आहे. यातच राज ठाकरे यांनी अलिकडेच घेतलेली हिंदुत्वाची भूमिका, तसेच कसब्यातील मनसेचं राहिलेलं महत्व याचा फायदा भाजपला अधिक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये.
तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. https://t.co/K9RBwu7Q0T— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
Read also
- हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
- हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे
- हेही वाचा..“जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना
- हेही वाचा..““राष्ट्रीय समाज पक्षाची पुर्ण ताकद हेमंत रासनेंना देणार, विजयी गुलाल उधळणार”, महादेव जानकर
- हेही वाचा..“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू