मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांनी सुपारी दिल्याचे संभाषण असलेली एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर या क्लिपमधील आवाज असलेल्या मनपा अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे प्रकरण सध्या चांगलचं चिघळत चाललं आहे. या प्रकरणावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांना ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आव्हाड यांच्या पत्नी ऋुता आव्हाड यांनीही वर्तक नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ऋता यांनी पोलिसांना आहेर यांच्याविरोधात सर्व पुरावे आणि कथित ऑडिओ क्लिपही दिली आहे. तसेच आता पोलीस काय कारवाई कऱणार हे आम्ही पाहत आहोत, असं ऋता आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना
एका ऑडिओ क्लिप व्हायरलमध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबत संभाषण आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वत: आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसेच आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला धडा शिकवल्यासाठी दिल्लीतील तिहार जेलमध्ये असलेला गॅंगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याला सुपारी दिल्याची कबुली देणारी ठाणे मनपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Read also
- हेही वाचा..“हेमंत रासनेंना आता व्यापारी संघटनांनीही दिला पाठिंबा, भेट घेत साधला संवाद”
- हेही वाचा..“..तर भारताची सुधारणा अशक्य,” जंयत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा
- हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
- हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली
- हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?