पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता बड्या नेत्यांनी नेत्यांनी देखील जातीनं लक्ष्य घातलं आहे. काल भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी आजारपणात असतांना देखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. गिरीश बापटांची ओळख किंगमेकर म्हणून राहिली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची देखील सभा येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्यासाठी शक्यता आहे.
हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”
काल भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कसब्याची पोटनिवडणुक चुरशीची वगैरे काही नाही. ही निवडणुक आपण जिंकणार, चांगल्या मतांनी जिंकणार आहे. निवडून आल्यावर पेढे द्यायला मीच परत तुमच्याकडे येईल. असं काल गिरीश बापटांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. गिरीश बापटांनी या मतदार संघावर गेल्या 25 वर्षापासून वर्चस्व गाजवलं होतं.
हेही वाचा…अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, राहुल कलाट्यांना वंचितचा पाठिंबा
महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी येत्या 22 फेब्रुवारी रोजी शरद पवारांची सभा होत आहे. कसब्यात शरद पवारांची संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी शरद पवार काय बोलणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर आदित्य ठाकरेंची देखील येत्या 23 तारखेला सभा होत आहे. त्यामुळे कसब्यातील येत्या काही दिवसांत निवडणुकीचा प्रचारांचा धुराळा उडणार आहे.
हेही वाचा..““देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला कसा वेळ मिळतो?”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील या पोटनिवडणुकांसाठी विशेष लक्ष घातलं आहे. त्यांनी अलिकडेच पुण्यातील पदाधिकाऱ्यांची सात तास मॅरेथॉन बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
Read also
- हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
- हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
- हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट
- हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!
- हेही वाचा..“ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण