पुणे : महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीसह विरोधी संस्था- संघटनांचे तगडे आव्हान असल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तुल्यबळ उमेदवार आणि भाजपाविरोधात वातावरण निर्मित करण्यासाठी राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवारानेही ताकद लावल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चिंचवड मतदार संघात भाजपा विरोधात सर्व अशी थेट निवडणूक होणे अपेक्षीत होते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी डावलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला. अर्ज माघारी घेण्यासाठी विचारणा झाली. मात्र, कलाटेंनी लढण्याचा विचार ठाम ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे आणि भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप अशी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेतल्यामुळे राष्ट्रवादी पेटून उठली असून, कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्वेशाने कामाला लागले आहेत.
हेही वाचा..“हेमंत रासनेंना आता व्यापारी संघटनांनीही दिला पाठिंबा, भेट घेत साधला संवाद”
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना 2014 आणि 2019 च्या विधानसभेत राहुल कलाट्यांनी जोरदार टक्कर दिली होती. 2014 साली राहुल कलाटे शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. तसेच, 2019 साली त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी लाखांच्यावर मत घेतली. या निवडणुकीत देखील राहुल कलाट्यांनी जोरदार तयारी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक प्रभागांवर त्यांनी बारीक लक्ष्य ठेऊन आपल्या कार्यकर्त्यांना अलर्ट केलं आहे. त्यातच त्यांना आता वंचितने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांची ताकद चिंचवडच्या शहरात अधिक असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा..“..तर भारताची सुधारणा अशक्य,” जंयत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा
नाना काटेंकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज…
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांच्यावर महाविकास आघाडीने विश्वास दाखवला आहे. अजित पवार यांचे कट्टर म्हणून नाना काटे यांची ओळख राहिली आहे. नाना काटे यांच्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीसह, कॅंग्रेस, आणि शिवसेनेची मोठी फौज मैदानात उतरली आहे. यात इतर राजकीय संघटनांचा देखील सहभाग आहे. यातच या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात जयंत पाटलांच्या उपस्थितीत तब्बल २५० कार्यकर्त्यांची युवकांची कार्यकारणीवर नियुक्ती केली आहे. युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता अल्हाट, प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांना या निवडणुकीकडे जातीन लक्ष्य घालण्याचे पक्षाने आदेश दिले आहेत. यातच बुधवारी काढलेल्या रॅलीत नाना काटे यांच्यासाठी आकर्षक रांगोळ्या, जोरदार आताषबाजी, फुलांचा वर्षाव करत थेरगावकरांनी नाना काटे यांचं जोरदार स्वागत केलं. यातच नाना काटे यांना महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केल्याने नाना काटे यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचं राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.
हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
भाजपाची धुरा सहानुभूतीवर…
दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवड मतदार संघावर लक्ष्मण जगताप यांनी दहा वर्ष वचर्स्व राखलं आहे. अश्विनी जगताप यांना महायुतीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, ( आठवले गट ) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटनांचा सहभाग आहे. अश्विनी जगताप यांना सहानुभुतीचा फायदा या पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. परंतु अश्विनी जगताप यांना नाना काटे आणि राहुल कलाटे यांचा मोठा सामाना करावा लागला आहे. त्यामुळे येत्या 02 मार्चला या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार त्याकडे आता सगळ्यांच लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण
- हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”
- हेही वाचा.अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, राहुल कलाट्यांना वंचितचा पाठिंबा
- हेही वाचा..““देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला कसा वेळ मिळतो?”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
- हेही वाचा..““आव्हाडांना मारण्याची धमकी, कार्यकर्त्यांची आयुक्तांना मारहाण, ऋुता आव्हाडांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन”