पुणे : चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत मावळचे आमदार सुनील शेळके ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेळके यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अन् शरद पवार पोटनिवडणुकीसाठी मैदानात”, पुण्यातील राजकारण तापणार
मावळ विधानसभा मतदार संघात २०१९ मध्ये भाजपचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांचा विक्रमी मतांनी पराभव करुन सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचा दबदबा वाढवला. अल्पावधीतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’मधील नेता म्हणून शेळके यांनी आपली ओळख निर्माण झाली.
हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
पश्चिम महाराष्ट्रातील युवकांची प्रचंड क्रेझ असलेल्या सुनील शेळके यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसमोर तगडे आव्हान निर्माण केले. विधानसभेत केलेले झंझावाती भाषण असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला केलेला सुपडासाप असेल…आमदार शेळके यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर निवडणूक निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. तत्पूर्वी, संघटनात्मक पातळीवरसुद्धा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोटनिवडणुकीत सुरूवातीपासून शेळके यांनी आघाडी घेतलेली पहायला मिळाली.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील एकूण १४ महापालिका प्रभागामध्ये सुनील शेळके यांनी अत्यंत प्रभावी प्रचार यंत्रणा कार्यान्वयीत केली आहे. प्रभागनिहाय प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली असून, शेळके यांच्या टीममधील तब्बल ३०० कार्यकर्ते फिल्डवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, दैनंदिन आढावा आणि प्रचार यंत्रणेबाबत सुनील शेळके नियमित अहवाल थेट अजित पवार यांना पाठवत आहेत. तसेच, भाजपाच्या नेत्यांना सडेतोड प्रत्त्यूतर देण्यात शेळके यांची आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे चिंचवडमधील पोटनिवडणुकीत सुनील शेळके ‘किंगमेकर’ ठरणार, असे चित्र आहे.
Read also
- चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
- ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर..! शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार
- हेही वाचा…चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
- हेही वाचा..स्पर्श घोटाळ्यातील वादी-प्रतिवादी राष्ट्रवादीत; योगेश बहल यांची घुसमट!
- हेही वाचा..“ आव्हाडांच्या स्वीय साहाय्यकांसह चौघांना एकदिवसीय पोलीस कोठडी, मारहाण प्रकरण अंगलट