मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांबाबत आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. यातच शिवसेनेची सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे.
हेही वाचा..चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेना विरोधात बंड केलं होतं. तेव्हा म्हणजे २१ जून ला शिवसेनेच्या ५५ पैकी २४ आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. त्या दिवशी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली. परंतु २१ तारखेलाच ३४ आमदार एकनाथ शिंदे सोबत होते. त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली. त्यामुळे अजय चौधरी यांची गटनेतेपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे. त्यानंतर २२ जुनला सुनील प्रभुंनी वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीत फक्त १४आमदार राहिले. असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
हेही वाचा..‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर..! शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार
त्यानंतर बहुमत नसतांनाही १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती. यावर उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांची आमदारांना मुदत देण्यात आली होती. २८ जूनला राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं.त्यानंतर ३० तारखेला एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हे दिल्याने भविष्यातील अनेक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पुन्हा एकदा मराठा समाजातील नेत्याकडे भाजप मुख्यमंत्र्यांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजची सत्ता आणण्यासाठी भाजप हा चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
- हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले”, राष्ट्रवादीची टिकात्मक पोस्ट
- हेही वाचा..‘मास्टर ब्लास्टर’ आमदार सुनील शेळके चिंचवडमध्ये ठरणार ‘किंगमेकर’