मुंबई : निवडणुक आयोगाने काल धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. आज महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शाखांवर शिंदे गटाकडून दावा सांगण्यात आला. तर विधानभवनातील कार्यालय आणि इतर ठिकाणंही शिंदे गट ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. यातच आता विधान परिषदेच्या ठाकरे गटातील 16 आमदारांवर देखील अपात्रतेची टांगती तलवार असूून उद्धव ठाकरे यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत आहे.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
आज राज्याचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी विधानभवनात शपथ घेतली. राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थितत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. छत्तीसगट राज्यातील रायपुर मधून आलेल्या रमेश बैस यांनी शपथविधी सोहळ्यात मराठी भाषेतून राज्यपाल पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात एक नवं राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या आमदारांवर विप सोडला जाऊ शकतो. यातच आता सत्ताधारी पक्षाचाच विधानसभा अध्यक्ष असल्याने यात ठाकरेची पंचाईत होण्याची शक्यता आहे. यातच नव्याने राज्यपालांनी शपथ घेतल्याने राज्यपाल प्रलंबित राहिलेल्या 12 विधान परिषदेंच्या आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो.
हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांबाबत आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. यातच शिवसेनेची सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
Read also
- हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
- हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
- हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?
- हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का