पुणे : कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. गणेश मंडळाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम देखील सर्वश्रुत आहे. याच प्रेमाचा प्रत्यय नुकताच आला आहे. आज प्रचाराच्या निमित्ताने मैदानावर फेरफटका मारत असताना काही क्रिकेट खेळत असणाऱ्या तरुणांनी रासने यांच्याकडे क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरताच रासने यांच्यातील क्रिकेटपटू जागा झाला आणि मग फलंदाजीसाठी उतरलेल्या रासने यांनी चौफेर फटकेबाजी त्यांनी केली.
हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, क्रिकेट आणि माझा अगदी लहानपणापासूनचा संबंध. पण राजकीय आणि सामाजिक जीवनात व्यस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दुरावलो.
हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
आज मात्र प्रचाराच्या निमित्ताने मैदानावर फेरफटका मारत असताना क्रिकेट खेळण्याचा आग्रह झाला. हा आग्रह माझ्यातला क्रिकेटप्रेमी टाळू शकला नाही. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर-रासने असा सामना होत असून आता हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
क्रिकेट आणि माझा अगदी लहानपणापासूनचा संबंध. पण राजकीय आणि सामाजिक जीवनात व्यस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दुरावलो. आज मात्र प्रचाराच्या निमित्ताने मैदानावर फेरफटका मारत असताना क्रिकेट खेळण्याचा आग्रह झाला. हा आग्रह माझ्यातला क्रिकेटप्रेमी टाळू शकला नाही.😀 pic.twitter.com/jaSGHIbNTm
— Hemant Rasane (@HemantNRasane) February 19, 2023
Read also
- हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
- हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
- हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”