पुणे : कसबा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक नेते मंडळींनी पुण्यात ठाण मांडले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले जात आहे. नुकतेच खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजारी असताना सुद्धा बापट मैदानात उतरल्याने कसब्यातील वारं फिरल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला
याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सूक्ष्म नियोजन करत असून ते स्वतः या या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. एका बाजूला भाजपने या निवडणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावली असताना दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
धंगेकर यांच्यावर असणारी एक जुनी केस ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. २००८ साली निगडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालं होता. आता याच प्रकरणात धंगेकर यांना उद्या (ता. २०)पिंपरी न्यायालयात कदाचित हजर रहावे लागू शकते अशी माहिती पुढे आली आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असताना अशा पद्धतीने न्यायालयाचे खेटे मारावे लागल्यास ते धंगेकर यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. यामुळे कसबा निवडणुकीत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
Read also
- हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”
- हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?