मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यात रूग्णलयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शरद पवार यांना आजारपणामुळे सातत्याने रूग्णालयात दाखल व्हावं लागतं. काही महिन्यांपुर्वी डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ते रूग्णालयात गेले असता. त्यांना त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगून दाखविला आहे.
हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
शरद पवार म्हणाले की, काही महिन्यांपुर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मी डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं आत्ताच करून टाका, पण डॉक्टर म्हणाले, एकदम तुमच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. जर तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
तसेच पुढे ते म्हणाले की, त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे. त्यामुळे मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतंय. त्यामुळे कोण काय करतयं हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही. असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
दरम्यान, अलिकडेच पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर बोलतांना त्यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे.
Read also
- हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”
- हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला