मुंबई : निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात शिवसैनिकांमध्ये शिंदेंच्या विरोधात रोष बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटात आनंदाचा वातावरण तयार झालं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. संजय राऊतांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे, आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. असंही त्यात राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात, त्यांच्याबाबत काय बोलणार ? मात्र माझ्या पर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की 2 हजार कोटींच डील आतापर्यंत झालं आहे. पुरावे लवकरच देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल. जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50 लाख आणि 1 कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेत. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
Read also
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला
- हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
- हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”