पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आता राज्यातील प्रमुख नेते मैदानात उतरून उमेदवारांचा प्रचार करतांना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे, भाजपकडून अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये जोरदार सभा होत आहेत. यातच अपक्ष म्हणून उभे असलेले राहुल कलाटे देखील मैदानात उतरून प्रचार करतांना दिसत आहेत. या सभांमधून आता एकमेकांवर टिका टिप्पणी सुरू झाली आहे.
हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?
महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने राहुल कलाटे नाराज झालेत. त्यानंतर राहुल कलाटे यांना अजित पवार, उद्धव ठाकरे यांनी विनंती करून देखील राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यावरून नाना काटे यांच्या प्रचारासाठी आलेले रोहित पवारांनी राहुल कलाटे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे अंहकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अंहकार स्वीकारत नाहीत. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील युवकांचा मोठा वर्ग हा रोहित पवारांना मानणारा आहे. तसेच चिंचवडमधील युवक हा राहुल कलाटे यांना मानणारा आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्याने युवक वर्ग कलाट्यांना नाकारून नाना काटे यांच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दुसरीकडे अश्विनी जगताप यांच्या प्रचासासाठी भाजपने राज्यातील सगळी यंत्रणा कामाला लावून दिली आहे. यातच उद्या अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप युवक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या चिंचवडमध्ये येत आहे. तेजस्वी सुर्या यांची तरूणांमध्ये मोठी क्रेज असून तरूण वर्गाचा अश्विनी जगताप यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चिंचवडमध्ये सुनील शेळके, रोहित पवार यांना मानणाऱ्या तरूणांची ताकद नाना काटे यांना मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आघाडीविरोधात बंडखोरी केल्यानंतर तरूण वर्गाचा फटका राहुल कलाटे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात मागील दोन विधानसभा राहुल कलाटे यांनी लढविल्या. 2014 साली राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणुक लढविली होती. या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील फोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. परंतु राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवरून ते ठाम राहिलेत. यावरून चिंचवडच्या मतदार राहुल कलाटे यांच्यावर नाराज असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे.
Read also
- हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
- हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
- हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
- हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”