पिपंरी चिंचवड प्रतिनिधी : येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होऊ घातलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचारांचा धुराळा उडाला आहे. भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे मैदानात उतरून जोरदार प्रचार करीत आहेत. यातच महाविकास आघाडीकडून नाना काटेंना उमेदवारी दिल्याने आघाडीवर नाराज होऊन राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फोन केला, तरी कलाटे उमेदवारीवर ठाम राहिले. आता राहुल कलाटे यांचा हा अति आत्मविश्वास पोटनिवडणुक धक्का देणार का ? असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कलाटे नाराज झाल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शिल्लेदार सुनील शेळके यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी देखील राहुल कलाटे यांना फोन करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तरीही राहुल कलाटे यांनी याकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर अजित पवारांनी प्रचारसभेतून जोरदार टिका करत राहुल कलाट्यांना सुचक इशारा दिला.
हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?
तसेच २०१९ च्या विधानसभेत राहुल कलाट्यांनी शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणुक लढवली होती. अपक्ष म्हणून अर्ज सादर केल्याने उद्धव ठाकरे यांनी आमदार सचिन अहिर यांना कलाट्याच्या भेटीला धाडलं. यावेळी त्यांच्यात वीस ते तीस मिनिटे चर्चा झाली. त्याचबरोबर कलाटे यांना उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली. तरीही देखील ते ठाम राहिलेत.
हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
यातच राज्यात सध्या बंडखोर आमदारांवर शिवसैनिकांचा मोठा रोष तयार झाला आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांना २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पडलेले मतदार यामुळे नाराज होण्याची शक्यता आहे. यातच पिंपळे गुरवमधून मत घेतली होती. मात्र या निवडणुकीत नाना काटे स्थानिक नेते असल्याने तेथील मतं देखील फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ०२ मार्चला चिंचवड पोटनिवडणुक मतदार कुणाच्या पारड्यात पाडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला
- हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
- हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
- हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा