पुणे : केंद्रीय मंत्री अमित शहा काल दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने सिंहगड काॅलेज येथे आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी काल पुण्यातील विविध कायक्रमाला उपस्थिती लावली. यातच त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचीही भेट घेतली. सध्या पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक लागली आहे. त्यामुळे अमित शहांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित शहांवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. अत्यंत अचुक अंदाज बांधणारे, सुक्ष्म रणनितीकार, निवडणुक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शहा साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजप विरोधातील असंतोष आणि संभाव्य निकाल त्यांनीही हेरला असावा. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातीला टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु राज्यातील प्रमुख नेत्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेऊन नाराजी दुर केली. यातच ब्राम्हण समाजाचा मेळावा देखील पार पडला. याचबरोबर काल अमित शहांनी देखील शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेतली.
अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा! pic.twitter.com/jWpP4Kmnad
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 19, 2023
Read also
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”
- हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला
- हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”