पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कसब्यात ही सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत राहणार आहे.
हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कसब्यात येत आहेत. कसब्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात आज मुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी भेटी घेणार आहेत. तसेच लोकांना ते संबोधितही करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सांयकाळी 4 ते 10 पर्यंत बैठका आणि कोपरा सभा घेणार आहेत.
हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”
येत्या 26 फेब्रवारी रोजी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर येत्या 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व पक्षाकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कसबा मतदार संघ मतदार कुणाच्या पारड्यात टाकणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढणार आहे. या बाईक रॅलीत काॅंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
Read also
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
- हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
- हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
- हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
- हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा