मुंबई : निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्व करण्यासाठी 2000 कोटींचा सौदा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर केला आहे. त्यावरून आता शिंदे गटाच्या आमदारांकडूनही जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“निवडणुक आयोगाच्या निर्णयावर काॅंग्रेस, राष्ट्रवादीला जास्त दु:ख”
संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले आहेत. यावर मी पुढे जास्त काही बोलणार नाही. कोण पिसाळत? हे तुम्हाला माहीत आहे. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंसोबत गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणुक आयोगानं बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे. बहुमताच्या आधारावर निवडणुक आयोगानं हा निकाल दिला. उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
तसेच बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील राऊतांवर जहरी टिका केली आहे. संजय राऊत हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची चाटूगिरी करणारा माणुस आहे. खरं म्हणजे आज एकनाथ शिंदे यांनी मागील सहा-सात महिन्यांमध्ये जो महाराष्ट्रात अनेक चांगल्या निर्णयांचा, विकासकामांचा धडका लावला. केंद्राची मतद घेऊन या राज्याला विकासाकडे त्यांनी नेलं, की जो विकास मागील अडीच वर्ष ठप्प झाला होता. म्हणून आता या लोकांना हे सहन होत नाही. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व त्यांना पाहावत नाही. मात्र एकनाथ शिंदे हे त्यांची वागणूक, बोलणं, काम यामुळे मोठे झाले आहेत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
दरम्यान, शिवसेना भवन हे आमच्यासाठी देवालय सारखं आहे. त्यामुळे आम्ही त्यासमोरून गेलो तर नक्कीच नतमस्तक होऊ. असं म्हणत बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेना भवनावरील दावा फेटाळून लावला आहे. यातच शिवसेना भवन ही शिवाई टस्टची जागा असून ती उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Read also
- हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
- हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
- हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
- हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”