मुंबई : निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केला आहे. याचा जोरदार फटका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालासंदर्भात चर्चा झाली. शरद पवार आणि ठाकरे यांनी कायदेशीर बाबींवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना आश्वत करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी चर्चा केली आहे.
हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
या चर्चेतील कायदेशीर बाबी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाणून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे जिल्ह्याप्रमुखांना काय आदेश देणा, हे पाहावे लागेल. तसेच उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा…उध्दव ठाकरेंच्या आधी एकनाथ शिंदेंनी गाठलं निलम गोऱ्हेंचं घर, निलम गोऱ्हेंना आज मातृशोक
- हेही वाचा…“राणेंचे दोन चिल्लर चार आणे भेकड, टिल्ल्यांनो, अजित पवारांचं नाव घेण्यापुर्वी 1000 विचार करा,” राष्ट्रवादीने डिवचलं
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”
- हेही वाचा..““एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात