मुंबई : सध्या महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मिंधे गटातील चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. झेंडा, नाव पळवायाचा सध्या चोरांचा काम सुरू झालं आहे. यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शिवसैनिक तयार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम आहे. अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधी आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
या बैठकीच्या आधी वकिलांची मोठी फौज देखील शिवसेना भवन येथे दाखल झाली आहे. यासाठी ज्येष्ठ वकिल उज्वल निकम हे ही उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. आगामी काळात यासंदर्भात काय कायदेशीर लढाई लढवाव्या लागतीलय. याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. त्याआधी विनायक राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
दरम्यान, चोरांनी कितीही पळवापळवी केली, तरी त्यांना धडा शिकवण्यासाठी आमचे शिवसैनिक समर्थ आहेत. तसेच शिवसेना भवनाबाबत बोलतांना ते म्हणाले की, मिंधे गटाने आपल्या सनदशीर मार्गाने कमावावं, मग त्यावर आपली मालकी सांगावी, त्यांनी आता आपला बाप देखील बदलला असून त्यांचा बाप आता अमित शहा झाला आहे. असा टोलाही राऊतांनी लगावला.
Read also
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
- हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
- हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”