पुणे : शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे सोमवारी निधन झालं आहे. त्या ८७ वर्षाच्या होत्या. आज सांयकाळी पाच वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी याठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुर दौरा आटोपून मॉडेल कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गोऱ्हे कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
आज कोल्हापुर येथे कणेरी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचे उद्धघाटन झाले. त्यानंतर लगचेच एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झालेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हे यांनी मॉडेल कॉलीत जाऊन त्यांनी भेट घेतली. मात्र शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आधी शिंदेंनी गोऱ्हेंची भेट घेतल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे आणि निवडणुक आयोगावर निशाणा साधला. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयावर ठाकरेंनी त्यावर जहरी टिका केली. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी आपला कार्यक्रम आटोपून लगेचच गोऱ्हेंच्या भेटीला गेलेत. यातच आज सांयकाळी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी कसब्यात सभा घेणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थितीत राहणार आहेत.
Read also
- “राणेंचे दोन चिल्लर चार आणे भेकड, टिल्ल्यांनो, अजित पवारांचं नाव घेण्यापुर्वी 1000 विचार करा,” राष्ट्रवादीने डिवचलं
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”
- हेही वाचा..““एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “