पुणे : मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर निवडणुक आयोगाने पुर्णविराम दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे. यातच पुढचा नंबर आता अजित पवार यांचा आहे. असं भाजपचे नेते निलेश राणे यांनी सांगितले आहे. त्यावर राष्ट्रवादीने जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे.
हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
निवडणुक आयोगाने निर्णय दिल्यानंतर निलेश राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. घमेंड आणि अंहकार माणसाची कशी वाट लावू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे, अजित पवार पुढचा नंबर तुमचा असू शकतो, घमेंड उतरवायचा सीजन चालू आहे. असं म्हणत निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
प्रशांत जगताप यांनी ट्विट करत राणेंवर निशाणा साधला आहे. हे राणे आणि त्यांचे दोन चिल्लर चार आणे भेकड आहेत.. टिल्ल्यांनो अजितदादांचं नाव घेण्यापुर्वी किमान 1000 वेळा विचार करा. खुप लोकांना सांगून धुळ चारली आहे. पुढचा नंबर तुम्हा दीड माणसांचा असू शकतो. असा इशारा प्रशांत जगताप यांनी राणेंना दिला आहे.
हे राणे आणि त्यांचे दोन चिल्लर चार आणे भेकड आहेत…
टिल्ल्यांनो आदरणीय अजितदादांचं नाव घेण्यापूर्वी किमान 1000 वेळा विचार करा. खूप लोकांना सांगून धूळ चारली आहे, पुढचा नंबर तुम्हा दीड माणसांचा असू शकतो. pic.twitter.com/aX2abWBaXm— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 19, 2023
Read also
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”
- हेही वाचा..““एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा