पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र यांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते काल पुण्यात एकवटले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काल भव्य बाईक व रोड शो आयोजित करण्याात आला होता. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद रवींद्र धंगेकरांना यावेळी मिळाला. याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत.
हेही वाचा…उध्दव ठाकरेंच्या आधी एकनाथ शिंदेंनी गाठलं निलम गोऱ्हेंचं घर, निलम गोऱ्हेंना आज मातृशोक
माझ्या प्रचारार्थ झालेल्या रॅलीला मिळालेला हा प्रतिसाद पाहून आज अक्षर:श डोळे पाणावले होते. किती ते लोकांचे प्रेम मी कमवले आहे. याची प्रचिती मला क्षणाक्षणाला मिळत होती. या रॅलीसाठी मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या, तसेच प्रत्येक चौकात मोठ्या उत्साहाने आतिषबाजी करत, पुष्पवर्षाव करत स्वागत करणाऱ्या तमाम पुणेकरांचा मी आभारी आहे. जे प्रेम या निवडणुकीच्या निमित्ताने मला मिळत आहे. खरोखर याची बरोबरी कुठल्याही सुखाशी होऊ शकत नाही, असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राणेंचे दोन चिल्लर चार आणे भेकड, टिल्ल्यांनो, अजित पवारांचं नाव घेण्यापुर्वी 1000 विचार करा,” राष्ट्रवादीने डिवचलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपला हा उत्साह मला अधिक उमेदीने अधिक ऊर्जेने यापुढील काळात देखील आपल्यासाठी २४ तास ३६५ दिवस सेवा करण्याची शक्ती देत राहिल. आपण ज्या मोठ्या विश्वासाने कुठल्याही अपप्रचारांना, कुठल्याही अफवांना बळी न पडता माझ्या खंबीरपणे उभे राहिले आहात, ही गोष्ट एका मोठ्या क्रांती पेक्षा कमी नाही. कसब्यात आपल्याला इतिहास घडवायचा आहे. आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच, असा शब्द मी आज पुन्हा एकदा आपणास देतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”
दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ पोटनिवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. यासाठी २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तर ०२ मार्च रोजी मतमोजणी होणार असून या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा…कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प.! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन
- हेही वाचा…““२०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा”, चंद्रकांत पाटलांचं आवाहन
- हेही वाचा..“२०२४ च्या निवडणुकीनंतर ठाकरेंसोबत फक्त किंचित सेना असेल”, भाजपने ठाकरेंना डिवचलं
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत स्थानिकांवरील अविश्वास हेच राष्ट्रवादीच्या अपयशाचे कारण..!
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंची पुढची भूमिका ठरली “?