पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी चिंचवडमध्ये जवळपास २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उभे राहिले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीत अशी थेट लढत असतांना या पोटनिवडणुकीत अपक्षांनी देखील आपला प्रचारास सुरूवात केली आहे. यातच अपना संघटनेचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार सिद्दीकभाई शेख यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी मराठवाड्यातील कामगारांना मराठवाडा भवन, शास्तीकराचा प्रश्न, फातमाबी शेख व मदर तेरसा स्मारक, महापुरूष बदनामी प्रतिबंधात्मक कायद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा..““आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच,”
राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देतात. त्यावरून सिद्धीक शेख यांनी जनतेसाठी जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर लिहून नोटराईज्ड करून जनतेसमोर सादर केला आहे. यामध्ये त्यांनी मतदार संघातील १२ मुद्दे मांडलेले आहेत. यामध्ये शासकीय शाळांमधून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवून सरकारी शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच चिंचवड शहारातील वाहतुक कोंडी, झोपडपट्ट्यांतील प्रश्न, गृहनिर्माण सोसायटीमधील कचऱ्याचा प्रश्न, मराठवाड्यातील कामासाठी आलेल्यांना मराठवाडा भवन बांधणार असल्याचं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
हेही वाचा…कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प.! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन
त्याचबरोबर मुस्लिम बांधवाना २५ वर्षाचा प्रलंबित असलेला कब्रस्तानचा प्रश्न, पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख व मदर तेरेसा यांचे स्मारक, अल्पसंख्यांक अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायदा, महापुरूष बदनामी प्रतिबंधात्मक कायदा, असे अनेक मुद्दे सिद्दीकभाई शेख यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे . ही आश्वासने पुर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर भारतीय दंड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरवावा, असंही शेख यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
हेही वाचा…““२०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा”, चंद्रकांत पाटलांचं आवाहन
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीकरीता भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे नाना काटे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे याठिकाणी अपक्ष उमेदवारांचा चांगलाच कस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ०२ मार्च ला मतदार कुणाच्या पारड्यात चिंचवड मतदार संघ टाकणार. ? ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..“आता विकास हवा, तर बॅट चा नवा पर्याय निवडा..! निळ्या शक्तीची ताकद दाखवा”, अपक्ष उमेदवार किशोर काशीराम यांचं आवाहन
- हेही वाचा..“आसाम मध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले”? न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
- हेही वाचा..““पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभावाची भीती, म्हणूनच पाच मंत्री पुण्यात,” थोरांताचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा..“कसब्यात प्रचंड प्रतिसाद, आपला विजय निश्चित”, हेमंत रासनेंच्या पदयात्रेत पंकजा मुंडेंचं विधान