मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षाची म्हणजे इंडियाची बैठक मुंबईत होत आहे. इंडियाच्या बैठिकाचं आयोजन यावेळी महाविकास आघाडीकडे देण्यात आलं असून ही बैठक येत्या ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीच्या वेळी इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण देखील करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा…“नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत” , शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र होणार ?
मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक होईल. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो अनावरण केले जाईल. तिन्ही पक्षाचा सोशल मीडिया एकत्र येऊन काम करतोय. या दोन दिवसाच्या बैठकीत देशातील १४० कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. इंडिया आघाडीच्या लोगो देशाची एकता दिसेल. अखंड भारताची उर्जा या लोगोत असेल. ६ राज्याचे मुख्यमंत्री येतील. सोनिया गांधी, राहुल गांधी, नितीश कुमार, एम के स्टॅलिन, जम्मू काश्मीरमधूनही नेते येतील. ही बैठक वैभवशाली असेल. त्याचा अजेंडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…शिंदे अन् फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच वाजलं, लोकसभेच्या या जागेसाठी जोरदार रस्सीखेच
इंडियाच्या बैठकीत आलेल्या सर्व नेत्यांचं तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात महाराष्टीय पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. डिनरमध्ये पुरणपोळी, झुणका भाकर, वडापाव आणि इतर महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. मुंबईच्या ग्रॅंड हयातमध्ये या सर्व गोष्टींची व्यवस्था महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा…“मोदी 2024 ला पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणारच नाही”
दरम्यान, येत्या ३१ आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जगभरातून ३८ पत्रकार येणार आहेत. देशातील शेकडो पत्रकार या बैठकीचे कव्हरेज करायला येतील. शिवसेनेने यजमानपद स्वीकारलेल्या या बैठकीची उत्सुकता जगाला आहे ३० तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीबाबत अधिकृत कार्यक्रम सांगतील. देशातील प्रमुख २८ पक्ष उपस्थित राहणार आहेत. असंही त्यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले
हेही वाचा…“शरद पवारांनी मैदान मारलं, पण अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्यु्त्तर”, वाचा सविस्तर